न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- रावेत येथील टॉप ८७ या हॉटेलच्या मालकाने हॉटेलच्या तोडलेल्या मोकळ्या जागेत २० ते २५ लोकांना बसवून अवैधरित्या हुक्का पार्लर चालवले. पोलिसांनी कारवाई करीत हुक्क्याचे पॉट, हुक्का पिण्याचे साहित्य एकूण आठ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस कर्मचारी योगेश गुळीग यांनी रावेत चौकीत फिर्याद दिली आहे. सचिन विठ्ठल वाळुंज (वय ३२, रा. आकुर्डी), दीपक भोंडवे (रा. रावेत) यांच्या आदेशाने मॅनेजर रितेश ओमप्रकाश शर्मा (वय २७, रा. रावेत) हे हॉटेल चालवत होता. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
















