न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- आरोपीने फिर्यादीच्या भावाच्या टेम्पोचे नुकसान केले म्हणून त्यांच्या विरोधात फिर्यादीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या कारणावरून चिडून जाऊन आरोपींनी फिर्यादीच्या भावाला कोयत्याने डोक्यात मारले.
तसेच तलवारीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मानेला मारून गंभीर दुखापत केली. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड येथे रविवारी (दि. ५) रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
अंजुम रहीस रंगरेज (वय २५, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुणाल सकट आणि संतोष नागेश आण्णामले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
















