- आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल; पाच जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- सिनेमा लेखकाला चित्रपटासाठी एकाने पैसे दिले होते. ते पैसे देण्यासाठी फिर्यादी हे शनिवारी दुपारी ऑफिस समोर गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला दगडांचा धाक दाखवून त्यांच्याकडील दहा लाख रुपये, संमती पत्र, हक्कसोडपत्र व पखवाज या फिल्मच्या सहा हार्ड डिस्क जबरदस्तीने पळवून घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.
पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे ही घटना घडली. शंकर निवृत्ती भेंडेकर (वय २९, रा. पिंपरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली. लिंबाजी भीमराव मुंढे (वय ३८), संग्राम अशोक मुंढे (वय २६, दोघेही रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), ज्ञानेश्वर बजरंग सकट (वय १९, रा. शिरगाव, ता. मावळ), सुमित सुरेश कदम (वय २३, रा. गोडुंब्रे, ता. मावळ), अमर मारप्पा वाघमारे (वय ३०, रा. मामुर्डी, देहूरोड) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह इतर अनोळखी आठ ते दहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरोडा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली.
















