न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२२) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा निमित पिंपरी येथील एच ए कॉलनी येथील शिवस्मारकाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दलाच्या वतीने परिसर पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आला व शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पंचगंगेचे पवित्र जल आणून पुतळ्याला गंगाजल व दुग्ध अभिषेक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना काळेवाडी विभागाच्यावतीने उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते यांच्या हस्ते अभिषेक व पुष्प हर अर्पण करून अभिवादन केले. विभाग प्रमुख गोरख पाटील यांच्या नियोजनाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी काळेवाडीतील जय हरी ग्रुपचे पदाधिकारी एकनाथ मंजाळ, सुनील वीटकर, चंद्रकांत गायकवाड, पोपट वाघमारे, सुनील जंगम, शंकर जाधव, रवी घडशी, राजेंद्र भरणे, जितेंद्र विटकर, काळेवाडी शाखाप्रमुख नरसिंग माने, सावता राम महापुरे, महादेव बिक्कड, विकास काजवे, सुभाष लोंढे, वासवानी सेठ, अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे व कर्मचारी यांनी ताबडतोब परिसर स्वच्छ करून दिल्यामुळे विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले व हरेश आबा नखाते यांनी मनपा प्रशासनाला शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे विसर पडलेला आहे याची महापालिकेला जाणीव करून दिली व पुढील वर्षी असे होणार नाही याची दक्षता घ्यायला विनंती केली व सर्वांचे आभार गोरख पाटील यांनी केले.
















