- कुस्तीपटू प्रगती गायकवाडने पटकावले ‘ रौप्यपदक ‘…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- खेलो इंडिया युथ गेम्स राष्ट्रीय स्पर्धा हरियाणा येथे सुरू आहेत. त्यातील कुस्ती स्पर्धेत प्रगती विनोद गायकवाड हिने ५७ किलो वजनगटात रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत कुस्ती या खेळात उत्तर भारतीयांवर एकतर्फी वर्चस्व गाजवत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
पैलवान प्रगती ही पिंपरी – चिंचवड शहराची महिला कुस्तीगीर आहे. प्रगतीने पिंपरी – चिंचवड शहर व जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असे पदक मिळविणारी ती एकमेव महिला कुस्तीगीर ठरली आहे. तिच्या यशाबद्दल कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगेसह आदींनी अभिनंदन केले.


















