न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने आज बुधवारी (दि. ८) रोजी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
यात वाकड परिसरातील प्रभाग क्र. २६ येथील कारवाईत वाकड ते बीआरटीएस व भुजबळ चौक येथे ६२ पत्राशेड निष्कासित करण्यात आले. या बांधकामाचे अंदाचे क्षेत्रफळ १,६२,०००. आहे.
” ई ” क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्र. क्र. ३. च-होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथिल नियोजित ४५ मी. रुंद रस्त्यानेबाधित उर्वरीत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण २० पत्राशेड बांधकाम / आर.सी.सी. अंदाजे क्षेत्रफळ २१,३९० चौ. फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.


















