- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमा खापरे यांची प्रतिक्रिया…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या भाजप नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. दिग्गजांना डावलून पक्षाने उमा खापरे या नव्या चेहऱ्याला संधी दिलेली आहे.
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मी पक्षाकडे मला विधानपरिषद पाहिजे म्हणून मागणी करायला गेलेली नव्हते. परंतु एका छोट्या कार्यकर्तीला न्याय हे केवळ भाजपाच देऊ शकते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. त्यांनी एका कार्यकर्तीला न्याय दिला.”
तसेच, “पंकजा मुंडेंचं नाव होतं आणि त्यांच्या ऐवजी मला उमेदवारी मला मिळाली, असं मी मानत नाही. कारण, त्या नेत्या आहेत. हा एका छोट्या कार्यकर्तीला मिळालेला न्याय आहे आणि मला एक विश्वास आहे की कदाचित पंकजा मुंडेंनी देखील माझ्या नावाची शिफारस केली असेल. असंही यावेळी उमा खापरे यांनी बोलून दाखवलं.”


















