न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा शिवसेनेचे युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्र काढून जाहीर निषेध केला आहे. त्यांनी शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाकडे भारतात विविध कुरघोड्या करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. गुरूवार (दि. १४) रोजी पाकड्यांच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ जाहीर निषेध करीत आहे.
मोदी सरकार या भ्याड हल्यास सडेतोड उत्तर देत नसेल, तर यावेळी मोदीला मतदान पण देऊ नका. होय वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मी शिवसैनिक आत्मघाती बॉम्ब बनविण्यास तयार आहे. ३० जवान शहीद झाल्याच्या बदल्यात मी ३००० पाकडे मारण्यास तयार आहे, असे दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.















