न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास १०० कोटींचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. त्याबाबत लहुजी शक्तीसेना पिंंपरी चिंचवड शहराध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून, पुढील समस्यांबाबत त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निवडणुकीच्या तोंडावर १०० कोटींचा निधी मंजुर केल्याबद्दल आपले शतशः आभार. परंतु, या घोषणेचा नुसता बेडकासारका फुगवटा नसवा. आपण मातंग समाजाचे अगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदान मिळविण्यासाठी १०० कोटींचा निधी मंजुर केल्याची घोषणा मोठ्या डौलाने केली. परंतु, साहेब स्मारक हा आस्मितेचा विषय तर आहेच, त्याचबरोबर १३% SC आरक्षणमधुन लोकसंखेनुसार अ ब क ड समाजाच्या मागणीकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ देखील समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार तरूण-तरूणी तसेच बंधु भगिनिंच्या कल्याणासाठी सुरू करणे गरजेचे आहे. आपण स्वतः गांभीर्याने या निवेदनाची दखल घेऊन, समाजाच्या उन्नतीसाठी तात्काळ निर्णय घ्यावा, असे दाखले यांनी म्हटले आहे.















