पिंपरी : नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्यावतीने खास महिलांकरिता उद्या शुक्रवार दिनांक ७ रोजी वेळ दुपारी २ ते ५ दरम्यान ”मोफत गणपती बनवा” या इको फ्रेंडली गणेशमुर्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहूनगर येथील पिरॅमिड हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला असुन, याकरीता कुठल्याही प्रकारचे साहित्य आणण्याची गरज नाही. गणेशमुर्तीकरीता लागणारे साहित्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
अधिक माहितीसाठी सौ. रेखा भोळे याच्यां ९६०७२०६८२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अनुराधाताई गोरखे व अमित गोरखे यांनी केले आहे.
















