न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली : स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या वतीने शनिवार दि.०८ रोजी सायं. ५ वा. कुदळवाडी येथील तात्यासाहेब सपकाळ क्रीडांगणामध्ये नवनिर्वाचित महापौर व पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार समारंभ व मोफत गॅस वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
समाविष्ट गावाला दुसऱ्यांदा महापौरपदी संधी देणारे भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त महापौर राहुलदादा जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, तसेच सर्व नवनिर्वाचित सभापतींचा नागरी सत्कार यावेळी करण्यात येणार असल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वितरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा सभापती संजय नेवाळे, नगरसेवक कुंदन गायकवाड, वसंत बोराटे, महिला व बालकल्याण सभापती स्वीनल म्हेत्रे, स्थायी समिती सदस्या साधना मळेकर, नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, अश्विनी बोबडे, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, सागर हिंगणे, पांडुरंग भालेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिवव्यख्याते प्रा. प्रदीप कदम यांचा विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे दिनेश यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
















