न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- शहरातील खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी क्रमांक २ अनुसार २०४ विद्यार्थ्यांचे मंगळवार अखेर दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित झाले आहेत. तर दिलेल्या मुदतीत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित न राहिल्यामुळे आरटीईच्या ३०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर, विविध कारणांमुळे २० विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
शहरामध्ये यंदा आरटीई अंतर्गत १७४ शाळांमध्ये विद्यार्थ्यासाठी जागा राखीव होत्या. या जागांसाठी ४ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. ६ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. २० तारखेपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सर्व प्रवेश न झाल्याने ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली. त्यानंतरही बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने पुन्हा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली.
या कालावधीत एकूण २०२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले तर, १०७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी होते. त्यानंतर मात्र प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील टप्पा क्रमांक २ मधील प्रवेशाला १४ जूनपासून सुरुवात झाली. २१ जूनपर्यंत मुदत दिल होती. त्यानंतरही प्रवेश राहिल्याने २८ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.