- योजनेविषयी प्रभावी जनजागृतीची आवश्यकता…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०२२) :- महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००९ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेकडे अर्ज करण्याची मुदत ३० जूनला संपली. पुणे महापालिकेप्रमाणे ३१ मार्च २०२३ पर्यंत नवीन मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यामध्ये सुधारणा करुन १२ मार्च २०२१ रोजी अधिनियम पारीत केला. त्या अनुषंगाने शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी २० डिसेंबर २०२१ पासून अर्ज स्वीकारले जात आहेत.
अर्जाची दुसरी मुदतवाढ २० एप्रिलपर्यंत होती. तिसरी मुदतवाढ ३० जून २०२२ ला संपली. या मुदतीमध्ये १ हजार २२५ अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जाचे क्षेत्रीय कार्यालयानिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. नियमातील अर्जावर कार्यवाही करून त्यांना गुंठेवारीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मुदतवाढीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.