न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- आईसोबत थांबलेल्या सहा वर्षीय मुलाला मृत्यूने हिरावून नेलं आहे. युवान दौंडकर (रा. पिंपळे सौदागर) असं मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
युवानची आई पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयासमोरील वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी आली. तेव्हा शेजारीच असलेल्या गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात बसल्या होत्या. ग्रँडर मशीनसोबत झोका खेळत असताना व्यवस्थित फिटिंग नसलेली मशीन युवानच्या अंगावर पडली.
युवानला बेशुद्ध अवस्थेत आईने उचलून तात्काळ रुग्णालयात नेल, तिथं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.