- राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेला आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाने केलेल्या मतदार याद्या तपासणीसाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदत दिली होती.
महापालिकेच्या ४६ प्रभागांतील प्रारूप मतदार यादीवर तब्बल ८ हजार ७०० हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचना प्रत्यक्ष स्थळनिहाय पाहणी करून त्यावर अंतिम निर्णय घेणे ९ जुलैपर्यंत शक्य नसल्याने महापालिकेकडून मुदतवाढ मागण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी निवडणूक आयोगाने महापालिकेला यासाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.