न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- ” मी टाईम स्पा ” या स्पा सेंटरमध्ये आरोपींनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी त्यांची उपजीविका भागवली.
पिंपरी, चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. तीन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ५) दुपारी तीनच्या दरम्यान कस्पटे वस्ती, वाकड येथे घडला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अजय अंकुश गवई (वय २० रा. वाकळकर वस्ती, हिंजवडी), सचिन सुरेश भिसे (रा. काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय गवई याला पोलिसांनी अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.