- या अधिकाऱ्यांचा आहे यात समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील १७ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी (दि. ५) याबाबत आदेश दिले आहेत.
यात सतीश नांदूरकर (सांगवी वाहतूक विभाग येथून गुन्हे शाखा युनिट २), ज्ञानेश्वर साबळे (आळंदी येथून म्हाळुगे चौकी), रवींद्र जाधव (दिघी आळंदी वाहतूक विभाग येथून नियंत्रण कक्ष), शिवाजी गवारे (नियंत्रण कक्षाशी संलग्र येथून भोसरी एमआयडीसी ठाणे), श्रीराम पौळ (रावेत ठाणे येथून नियंत्रण कक्ष), शहाजी पवार (नियंत्रण कक्ष येथून दिघी आळंदी वाहतूक विभाग), रघुनाथ उंडे (पिंपरी वाहतूक विभाग येथून निगडी ठाणे), शंकर बाबर (गुन्हे शाखा युनिट ३ येथून विशेष शाखा), जितेंद्र कदम (भोसरी ठाणे येथून जलद प्रतिसाद पथक), रामदास इंगवले (गुन्हे शाखा युनिट ५ येथून दरोडा विरोधी पथक), अरविंद पवार (म्हाळुगे चौकी येथून भोसरी ठाणे), राम राजमाने (चिचवड वाहतूक विभाग येथून युनिट ३), दशरथ वाघमोडे (म्हाळुंगे चौकी येथून दिघी ठाणे), किशोर पाटील (चिचवड येथून म्हाळुंगे चौकी), मधुकर खंडाळे (आर्थिक गुन्हे शाखा येथून युनिट ५), नितीन लांडगे (भोसरी येथून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) येथे या निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.