न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्यास सांगून ऑनलाइन दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सांगवी येथे घडला. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने फिर्यादीस एमएसईबीचे पेमेंट अपडेट करायचे असल्याचे खोटे सांगितले. त्यासाठी फिर्यादीच्या मोबाईलमध्ये क्विक सपोर्ट ॲप व एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर मोबाईलचा स्क्रीन शेअर करून इंटरनेटचा वापर करीत फिर्यादीच्या बँक खात्यातून नकळत दहा लाख ३० हजार ९२० रुपये वेगवेगळ्या खात्यांवर घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.