न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२२) :- कामावर जात असताना नेवाळे वस्ती येथील एका सलूनच्या दुकानाजवळ चार जण थांबले होते. त्यांनी फिर्यादीला धारदार हत्याराने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्यानंतर त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये व मोबाईल काढून ते पसार झाले. पोपट गोरख ताटे (रा. नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.