न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०२२) :- भिशीमध्ये पैसे गुंतविल्यास जास्त व्याज व बोनसचे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले. फिर्यादी यांना रोख, ऑनलाइन व धनादेशद्वारे भिशीत पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानुसार बारा लाख ६० हजार रुपये घेतले. मात्र, नंतर ही रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत या रकमेचा अपहार करीत फसवणूक केली.
ही घटना रहाटणी येथे घडली. संजयकुमार अंगद सावंत (रा. शिवराज नगर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरी गायकवाड, अलका गायकवाड, संदीप पवार, कविता गायकवाड (सर्व रा. ग्रीन स्पिरीट सोसायटी, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.