न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०२२) :- सासऱ्यांच्या मालकीची ५० हजार रुपये किंमतीची निळ्या रंगाची ह्युंडायी कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अमीर पठाण, (वय ३२, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी ५ जुलै रोजी रात्री ९.३० ते ६ जुलै सकाळी ७.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.