न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०२२) :- चिंचवड येथील डांगे चौकात आज सकाळी अकराच्या सुमारास ग्रेडसेपरेटर मधील रस्त्यावर टँकरमधून ऑइल गळती झाली होती. त्यात १५ ते २० दुचाकी चालक घसरून पडले. काही किरकोळ जखमी झाले.
दरम्यान प्रसंगावधान बाळगून थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी तिथली वाहतूक थांबवली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचत रस्त्यावरील ऑईल पाण्याने धुवून काढलं.
त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान पावसाळ्यात दुचाकी चालकांनी विशेष काळजी घेऊन दुचाकी चालवण्याची गरज आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.