न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०२२) :- ” मी तुझ्याशीच लग्न करणार ” असे म्हणत आरोपीने पीडित मुलीशी जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले. यामध्ये मुलगी गर्भवती राहिली. ही घटना चिंचवड येथे घडली.
पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अजय शंकर फडतरे (वय १९, रा. चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.