न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०२२) :- पाषाण येथील सुतारवाडी येथे फिर्यादी यांच्या मालकीची सात गुंठे जागा असून त्या जागेवरून आरोपींनी फिर्यादी यांना हाकलून दिले. त्या जागेवर अतिक्रमण करून उभारलेले फर्निचरचे दुकान भाड्याने दिले.
‘आम्ही पाषाण गावातील स्थानिक रहिवासी असून येथे परत आल्यास तुझे हात पाय तोडून टाकू’, अशी धमकी दिली. फिर्यादी यांना जातीवरून उच्चारून अपमान करीत जागा ताब्यात देण्यास नकार दिला.
शैलेंद्र सोनकर (वय ४२ वर्ष रा. पिंपरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कालिदास किशनराव कोकाटे, नारायण बबनराव कोकाटे, शिवाजी पंढरीनाथ कोकाटे (सर्व रा. पाषाण) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.