न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्यावतीने चिंचवडगाव व चऱ्होलीतील वडमुखवाडी या ठिकाणी नव्याने स्मशानभुमी बांधावी, निगडी येथे नव्याने विदूतदाहिनी बसवावी तसेच जुनी सांगवीतील अर्धवट कामे पुर्ण करण्याबाबत आंदोलन केले होते.
मनसे शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हार्डिकर व महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन त्यांना या समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात याकरिता स्मरणपत्र दिले. यावेळी आयुक्तांनी लवकरच या सर्व परिसरात भेटी देऊन मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन या मनसे शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, मनविसे शहराध्यक्ष हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष अंकुश तापकीर, राजु सावळे, बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयुर चिचंवडे, मनविसे उपशहराध्यक्ष अमित तापकीर आदी उपस्थित होते.
















