न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केली. घरातून हाकलून देण्याची धमकी देत तीस तोळे सोणे आणण्यास सांगितले. या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना निगडीत घडली.
अमृता प्रवीण कुटे (वय ३० दत्तवाडी, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील महादेव चंद्रकांत गवळी (रा. देशमुखवाडी, शिवणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण गोविंद कुटे (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली असून दोन महिलांवर गुन्हा दाखल आहे. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.