न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२२) :- मोटारीतून घरी जात असताना आरोपींनी त्यांची मोटार पिंपरीतील वल्लभनगर येथे अडवली. त्यांना शिवीगाळ करून सिमेंटचा गट्टू व विटेच्या साहाय्याने मोटारीचे नुकसान केले.
त्यानंतर फिर्यादीच्या पाकिटातील तीन हजारांची रोकड काढून घेत आरोपी दुचाकीवरून पसार झाले. अक्षय शिरीष कोठारी (रा.सुखसागर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण वंजारे (वय २१, रा. दत्तनगर, चिंचवड) व प्रथमेश यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.