न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- शहर हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका आयुक्तांनी आवाहन आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्रेंडशिप डे निमित्त स्टुडंट्स एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या स्टुडन्ट अकॅडमीने प्रभातफेरी काढली. चिखलीतील नेवाळे वस्ती, घरकुल परिसरात विद्यार्थ्यांनी झाडे हातात घेत जनजागृती केली.
पिंपरी चिंचवड शहर हरित करण्याचा संकल्प करीत विद्यार्थ्यामध्ये वृक्षाबद्दल आत्मीयता वाढीस लागावी व संवेदना जागृत व्हावी हा दृष्टिकोन ठेवून पर्यावरण वाचवण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला, अशी माहिती स्टुडन्ट अकॅडमीचे संस्थापक विजय सोनवले सर यांनी दिली.