न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- मोठमोठ्याने आरडा-ओरड करत फिर्यादीला आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांचा पॅगो टेम्पोच्या काचा फोडून ९ हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील ५०० रुपये काढून घेतले.
मी इथला भाई आहे. तुम्ही माझे काही वाकडे करु शकत नाही, पोलीस तक्रार दिली तर मी सोडणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार दापोडीतील पिंपळेगुरवकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ रविवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजता घडला.
संगाप्पा इराप्पा पुजारी (वय ३८ रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. प्रफुल्ल महादेव अडसुळे (रा. फुगेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.