- फुगेवाडीतील प्रेसमध्ये आरोपींची तोडफोड अनं धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- तुमच्या चाळीत नवीन होणा-या बांधकामात मला व माझ्या दोस्तांना दारुची पार्टी करता कायमची रुम दे नाहीतर तुला मारुन टाकीन, असे आरोपीने फिर्यादी यांना फोन करत धमकी देत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या फुगेवाडीतील मालकीच्या प्रेसमध्ये जात प्रिंटर्स चालकाला मारहाण करत प्रेस बंद करण्यास सांगितले.
तेथे उभ्या केलेल्या फिर्यादीच्या मालकीची दुचाकीची लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याच्या साह्याने तोडफोड करीत आरोपींनी फिर्यादींना यांना धमकावले, असे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
हा प्रकार सोमवारी (दि. ८) फुगेवाडी येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला. हेमंत लक्ष्मण फुगे (वय ४४, रा. फुगेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल दिनकर (रा. फुगेवाडी) याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.