न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२२) :- तापकीरनगर येथील ओम साई ग्रुपच्या वतीने शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट क्रांतीदिनी भारतीय थोर क्रांतिवीर यांची शालेय उपयोगी माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले, त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ तापकीर, भाजपा वैद्यकीय आघाडी आयुर्वेद विभाग, पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक डॉ. मनोहर शिंदे, अनिल नथांनी, अशोक शेळके, सिद्धेश्वर फसले, केतन पडवळ, अजित धारूरकर, महादू कलशेट्टी, दौलत पवार, मोहन चव्हाण व नयाज शेख उपस्थित होते. मुलं व शिक्षक, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा भालचीम यांनी आभार मानले.












