न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२२) :- लायन्स क्लब ऑफ पुणे चतुशृंगी शाखेच्या वतीने पुण्यातील सावित्रीबाई फुले प्रशाला (ज्युनिअर कॉलेज) भवानी पेठ, पुणे येथे पर्मनंट प्रोजेक्ट्स म्हणून बुक बँक स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी पोपटराव काळे उपस्थित होते.
दरम्यान लायन्स क्लब संस्थेचे अध्यक्ष विजय भिसे यांच्या हस्ते या स्तुत्य उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी नितीन थोपटे, खजिनदार महेश खडके आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र गाढवे यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले .