- रात्री-अपरात्री रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांची होतेय कुचंबणा..
- पथदिवे त्वरित दुरुस्त करा; अधिकाऱ्यांना फैलावर घ्या – विवेक तापकीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- तापकीरनगर परिसरातील साई मल्हार कॅालनी येथील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका आयुक्तांनी येथील पथदिवे त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना फैलावर घ्यावे, अशी मागणी साई मल्हार सोशल फांऊडेशनचे सचिव विवेक मल्हारी तापकीर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या भागात मोठया प्रमाणावर लोकवस्ती असल्यामुळे हा रस्ता वर्दळीचा आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री येथील रस्त्यावरून ये-जा करताना महीला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांची कुचंबणा होते. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे आयुक्तांनी पथदिवे दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.












