न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- पिंपरीत ” कराची भवन, कराची स्वीट” नावाने व्यवसाय सुरु आहे. ही नावे तात्काळ बदलण्यात यावीत यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने आज पिंपरी येथील शगुन चौकात ” तिरंगा आंदोलन ” करण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांकडून चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक बोबडे यांनी दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या आंदोलनामध्ये अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, भीमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, रौफ शेख, दीपा बनसोडे तौफिक पठाण, ऍड फारुख शेख, संजय बनसोडे, मलंग शेख, अयुब इनामदार, मुस्तफा तांबोळी, फिरोज शेख, प्रकाश पठारे, दीपक खैरनार, शिव सावंत, गणेश जगताप, विशाल बोत्रे, गणेश अडागळे आदी उपस्थित होते.












