न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- यंदाचा पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत अधिकारी पुरस्कार रमेश सोपान कदम यांना जाहीर झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे स्वातंत्र्यदिनी पुणे जिल्हा परिषदेच्या ‘मागील ६० वर्षांचा मागोवा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि विविध पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते.
त्यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कदम यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कारामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुरस्कार मिळाल्यामुळे आता अधिक गुणवत्तापूर्वक कामाची जबाबदारी शिरावर येऊन ठेपली आहे. पुढील काळात या भूमिकेला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असा विश्वास पुरस्कार प्राप्त गुणवंत अधिकारी रमेश सोपान कदम यांनी ‘ न्यूज पीसीएमसी ‘ शी बोलताना व्यक्त केला.












