न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२२) :- वराळे गावच्या हद्दीतील कॉर्नींग कंपनीजवळ पोलिसांनी आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडे लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी व कोयता, लोखंडी पाईप तसेच तसेच दुचाकी असा एकूण ३० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी आरोपींकडे अधिक तपास केला असता ते वराळे येथील अमेझॉन कंपनीवर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी (दि. १४) रात्री दहाच्या दरम्यान बातमीदारामार्फेत मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी कारवाई केली.
सागर राहूल खेडकर (वय २०, रा.भोसरी), महेश कान्हा राजपूत (वय १९, रा. भोसरी) यांना अटक केली असून, दोन अल्पवयीन साथादारांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, यातील भिष्मा उर्फ झिंगरू शंकर राठोड हा फरार आहे. म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहेत.












