न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२२) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुदळवाडीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक ८९ मध्ये “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत बुधवारी सकाळी ठीक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले. यात माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन, विद्यार्थी, शिक्षकवर्ग सहभागी झाले होते.
राष्ट्रगीताच्या या समूह गायनाचा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र साजरा झाला. त्यात सर्व अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित केल आहे.
नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहे. त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती दिनेश यादव यांनी दिली.












