न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपी फिर्यादीस एप्रिल २०२२ पासून सतत त्रास देत होता. गुरुवारीही त्याने फिर्यादी यांचा पाठलाग करत तू माझ्या बरोबर राहणार नाहीस तर तुला जगायचा काही अधिकार नाही म्हणत फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवला.
आरोपीने यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी फिर्यादीचा पाठलाग करत त्यांचा फोन ओढून घेऊन मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच त्याचा मित्रांना फिर्यादी व त्याचे एकत्र असलेले फोटो दाखवून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली.
ही घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी तीनच्या दरम्यान देहूरोड येथील शितळानगर येथे घडली. या त्रासाला कंटाळून पिडीत महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. अर्जून शशी सप्पागुरु (वय २१ रा. शितळानगर,देहुरोड) याला अटक केली आहे. देहुरोड पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.