न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करण्यात आली. संत- महंत, ह.भ.प.आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते गरजू नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले.
नागरिकांना विमा स्वरूपात प्रमाणपत्र, सामाजिक संस्था व नागरिकांना ६ ते ८ फूट उंचीचे जाळीसह दोन हजार वृक्ष वाटप, एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बाल आधार कार्ड, विधवांना पेन्शन कार्ड वाटप, अंध अपंगांना शॉप ऍक्ट लायसन वाटप आदी समजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
















