न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव प्राधिकरण येथे सेक्टर २५ येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी पुजेचा मान पुजा भागवत व स्वप्निल भागवत यांना मिळाला.
यावेळी श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्यासमेवत इतर महिलांनी भजन, किर्तन, रास गरबाचे सादरीकरण केले. यावेळी पुनम पटेल, हेमलताबेन पटेल, भानुबेन मखवाना, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, चित्रा अय्यर, कामिना पंड्या यांच्या समवेत अनेक भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, जिग्नेश पटेल, अभिषेक पटेल, हार्दिक जानी, मुकेश पंड्या, राजेंद्र बाबर, नितेश मखवाना व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
















