न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२२) :- रहाटणीत स्टार मेकर ॲपवर फिर्यादी महिलेशी आरोपीने मैत्री केली. फिर्यादीला प्रपोज केल्यावर त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्या ॲपवरून मोबाईल व व्हाट्सअपवरून मेसेज करून फिर्यादीस अश्लील शब्द वापरले.
या अँपवरून फिर्यादीच्या फोटोचा गैरवापर करून त्याखाली त्यांच्या मनास लज्जा निर्माण करणारे मेसेज प्रसारित केले. त्यामुळे फिर्यादी यांना इतर लोकांनी फोन करून त्रास दिला व बदनामी केली. ही गोष्ट फिर्यादी महिलेने आरोपीच्या पत्नीस सांगितली. तिनेही फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. दोघांनीही आणखी बदनामी करण्याची व मारण्याची धमकी दिली.
महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमर थापा व महिला (दोघे रा. रांची, झारखंड) या आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















