न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२२) :- इंस्टाग्राम ॲपवरून फिर्यादी व आरोपी यांची ओळख झाली होती. आरोपीने रुपीनगर येथील लॉजवर व वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर तसेच फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणच्या रूमवर त्यांना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
फिर्यादीबरोबर मोबाईल व इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर संभाषण करून बदनामी करण्याची धमकी दिली. हा प्रकार ९ मे २०२१ ते २३ ऑगस्ट २०२२ रात्री ११.४० वाजता घडला. पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश गोरे, (वय २४ रा. जिल्हा बीड) या आरोपी विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















