न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२२) :- घराच्या पहिल्या मजल्यावर जिन्याने जात असताना आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला. फिर्यादीच्या मागून येऊन काही कारण नसताना शिवीगाळ केली. आरोपीने फिर्यादी यांच्या उजव्या हाताला पकडून, त्यांच्या शरीराला स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न केली.
फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या त्यांच्या भावासही शिवीगाळ करुन हाताने मारहाण करीत उजव्या हाताला चावा घेतला. तसेच पोलिस असल्याची खोटी बतावणी करीत तोतयागिरी केली.
हा प्रकार पिंपळे गुरव काटेपुरम चौकाजवळ रात्री १०:२० ते १०:३० च्या दरम्यान घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. प्रसन्न टेळे (वय २७ रा. कोथरूड मूळ सोलापूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.
















