न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १९ फेब्रु.) :- आय. आय. बी. एम. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिखली येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पिं. चिं. मनपा. नगरसेवक दत्ता साने, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर, संगिता ताम्हाणे, तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे, शरद भालेकर, सचिन गारगोटे, राहुल जगताप, तसेच डॉ. मोहन काळे, आयआयबीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटचे संस्थापक धनंजय वर्णेकर, विभागप्रमुख अमोल भागवत, सागर पाटील, कु. प्रतिक्षा डफळ, सविता साळुंखे, संतोष घाडगे, कु. अतुल पुंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ०७ वाजता धर्मवीर श्री. संभाजीराजे यांचे समाधीस्थळ तुळापुर या ठिकाणी मशाल प्रज्वलनाने झाली. यावेळी कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉलेज मैदानात आल्यानंतर मशालीने दीप प्रज्वलन व शिवमूर्तीची पूजा आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करून, पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांचे पोवाडे, भाषण, एकांकिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या. कॉलेज अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिवचित्र याविषयी चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणसुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कॉलेजचे संस्थापक धनंजय वर्णेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवाजी महाराजांचे थोडक्यात कार्य सांगून, त्यांचे विचार कसे आमलात आणले पाहिजेत, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विभागप्रमुख अमोल भागवत यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासंदर्भात तसेच अभ्यासक्रमासंदर्भात मार्गदर्शन करून, आयआयबीएम कॉलेजमधील एकही विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही, अशी शाश्वती शिवाजी महाराज व अध्यक्ष यांच्यासमोर विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यानी पायी रॅली काढून चिखली गावामधील गावकर्यांना प्रदूषण, पाणी वाचवा, पर्यावरण, वाहतूक नियम याबाबत जनजागृती केली तसेच १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन कु. लक्ष्मण पुंडे, योगेश राठोड, सौरभ भागवत, किरण वाघमारे यांनी व सूत्रसंचालन कॉलेजचे विद्यार्थी कु. यश आढळराव व कु. प्रीती थेंग यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर पाटील व कु. प्रतिक्षा डफळ यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली. अशाप्रकारे मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.











