न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- महिला व त्यांच्या मुली घरी टीव्ही पाहत होत्या. आरोपी तेथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ करीत महिला व तिच्या मुलींसमोर अश्लील वर्तन केले.
मारहाण करण्याची धमकी देत अंगावर धावून आला. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे घडली. महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल मारूती किर्ते (वय ४०, रा. इंदिरानगर, ओटास्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.















