न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२२) :- दापोडी येथील उपनिबंधक कार्यालयातील शिपायाने कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक पदावर नेमणूक झाल्याचे पत्र एकाला दिले. तसेच अन्य कागदपत्रेही दिली. पत्र घेऊन ती व्यक्ती उपनिबंधक कार्यालयात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
ही घटना १ एप्रिल २०२१ ते १० जानेवारी २०२२ या दरम्यान दापोडीतील उपनिबंधक सहकारी संस्था येथे घडली. संतोष तुकाराम शिंगाडे (वय ४१, रा. पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि. १२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे मुख्य लिपिक पदावर काम करतात. शशांक बळवंत हाटे (वय ४१, रा. रास्ता पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या शिपायाचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















