न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले. त्यांनंतर राज्यभर गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले. संपूर्ण गणेशोत्सवात कोणत्याही मंडळांवर पोलिसांकडून कारवाई झाली नसल्याने यावर्षीच्या गणेश मंडळांना बाप्पा पावला असल्याचे म्हटले जात आहे.
दीड दिवसापासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. सातव्या आणि दहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन झाले. भोसरी चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड, वाकड, हिंजवडी, सांगवी येथे निघालेल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात डीजे लावण्यात आले. डीजेच्या थरथराटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही होता. घाटांवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
यावर्षी सर्व मंडळांमध्ये एक प्रकारचा निवांतपणा होता. मिरवणुका वेळेत संपविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असतात. त्यामुळे दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिरवणुकांना सुरुवात करण्याच्या सूचना मंडळांना दिल्या. मात्र मंडळांनी मिरवणुकांना उशिरा सुरुवात केली. त्यामुळे रात्री मिरवणुका पुढे ढकलण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. रात्री बाराच्या ठोक्यावर डीजेचे आवाज बंद करण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखविली. त्यानंतर मात्र पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र यावर्षी कोणत्याही मंडळावर कारवाई झाली नाही. तसेच मिरवणुकांमध्ये हाणामारी, दंगा करणे अशा प्रकारचे देखील गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.











![[गणेश मंडळ] संपूर्ण गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड शहरात कुठलीही अनुचित घटना नाही...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-2-12-90x60.jpg)
![[गणेश मंडळ] संपूर्ण गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड शहरात कुठलीही अनुचित घटना नाही...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/IMG_6949-90x60.jpg)





