न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- तुम्ही माझ्या मुलीचं वाटोळं केलं आहे, असे बोलून आरोपीने फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना ढकलून देत लोखंडी सळईने डोक्यात मारले. त्यात फिर्यादी जखमी झाले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली.
फिर्यादी यांच्या मुलीला आणि जावयाला मारून टाकण्याची आरोपींनी धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. १८) सायंकाळी जाधववाडी, चिखली येथे घडला.
सुरेश मारुती दळवी (वय ६५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेश जांभुळकर (रा. जाधववाडी, चिखली) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


















