न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- ६० हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १४/एचएम ५१०९) घरासमोरील रस्त्यावर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली.
शनिवारी (दि. १७) रात्री दहा ते रविवारी (दि. १८) पहाटे साडेपाचच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे हा प्रकार घडला. जयराम जालिंदर शिंदे (वय ४७, रा. काळाखडक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.