- महापालिका ५८ कोटी खर्चून करणार उड्डाणपुलाची निर्मिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म लोहमार्गावर संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी – चिंचवड महापालिकेने उड्डाणपूल बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यासाठी स्थापत्य विभागाकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
डेअरी फार्म येथील रेल्वे रुळावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून आज ५८ कोटी ५७ लाख ३०५७७ रुपये खर्चाची निविदा प्रसिध्द करण्यात आला आहे. तो बांधण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
२४ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ ई निविदा भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी वाजेपर्यंत अंतिम निविदा स्वीकारली जाणार आहे. तर १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता निविदा उघडली जाणार आहे.


















